मुंबई, 4 जूनः राज्यातील काही जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांवर मास्क सक्त करण्यात आल्याचे वृत्त दाखवण्यात आले होते. मात्र राज्यात तुर्तस तरी मास्क सक्ती नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सचिवांनी काढलेल्या पत्रकात मास्क घालणे अनिवार्य असल्याचे म्हटल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती केल्याचा सर्वांचा समज झाला. मात्र अनिवार्य शब्द सक्ती असा न घेता तो केवळ मास्क वापरण्याचे आवाहन असा शब्द प्रयोग माध्यमांनी लोकांना सांगावे. त्यामुळे मास्क न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई होणार नाही, असे आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे.
मुंबईसह राज्यातील काही जिल्हे पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आदींमध्ये थोड्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. राज्यासह मुंबईत दररोज कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा 1100 पार गेला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी नागरीकांना मास्क अनिवार्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र स्वतःची काळजी घेण्यासाठी बंद ठिकाणी उदा. बसेस, रेल्वे, शाळा, कार्यालये या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. यासह राज्यातील नागरीकांना लसीकरण करा, बूस्टर डोस घेण्याच्या सूचना केल्या आहेत.