अनेकांनी वेगवेगळ्या जातीचे, प्रकारचे सर्प पाहिले असतील वा त्या बाबत माहितीही असेल. मात्र कधी शिंगं असलेल्या सर्पाबाबत ऐकलं आहे का? मात्र सध्या सोशल मीडियावर असाच एक विचित्र सर्पाचा फोटो व्हायरल होत आहे. दोन शिंगं असलेला सर्प नुकताच दिसून आला आहे. सध्या या सर्पाची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
सोशल मीडियावर एका सर्पाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हा सर्प धावताना दिसतोय. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्पाच्या डोक्यावर दोन शिंगं दिसताहेत. हा विचित्र सर्प पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करताहेत.
#NationalGeographic horn snake pic.twitter.com/m3lOD0Gz8p
— Mitulg881 (@mitulg881) September 13, 2022
ट्विटरवर @mitulg881 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका शेतातील आहे. ज्यात हा विचित्र सर्प वेगाने धावतोय. हा सर्प पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही लोक म्हणतात की हा कलियुगाचा चमत्कार आहे. तर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, अखेर सर्पच्या डोक्यावर शिंग कसे बाहेर येणार? हा व्हिडीओ आणखी निरखून पाहिल्यावर हा साप इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. हा व्हिडीओ खोटा असल्याचे अनेकांचे मत आहे.
मात्र या व्हिडीओमध्ये सर्पच्या डोक्यावरचे शिंगं स्पष्टपणे दिसत आहे. डोक्याच्या दोन्ही बाजूंना हॉर्नसारखे पसरलेले अवयव दिसतात. हे पाहिल्यानंतर लोक म्हणतात की हा शिंगं असलेला सर्प आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स मजेशीर कमेंटही करत आहेत. सोशल मीडियावर काही लोक म्हणतात की, सर्पाने बेडूक खाल्ला असावा आणि सर्पाने बेडकाला तोंडात पकडले आहे, त्यामूळे हे बेडकाचे पाय दिसताहेत. हा अनोखा सर्प पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी मात्र हा व्हिडीओ खोटा आहे की खरा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळवंटी भागात असे सर्प आढळतात ज्यांच्या डोक्याला शिंगं असतात. या भागात आढळणाऱ्या सर्पाचे नाव वाइपर असून ते अत्यंत विषारी असतात. राजस्थानच्या वाळवंटात असे साप आढळणे सामान्य आहे.