हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

मुंबई/कुलाबा, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या या आंदोलनात अनेक नेत्यांची घरे आणि गाड्यांना लक्ष करण्यात आले आहे. अशातच राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ एसयूव्ही गाडी उभी होती. त्यावेळी अज्ञातांनी याठिकाणी येऊन त्यांच्या या गाडीची तोडफोड केली. त्यांनी या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. त्यावेळी आंदोलक ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत होते. ही घटना आज (दि.01) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिस करीत आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व नेत्यांच्या निवासस्थानाची तसेच कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय राज्यात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतापलेल्या आंदोलकांनी 26 ऑक्टोंबर रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली होती. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वी बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्यांना मराठा आंदोलकांनी आग लावली होती तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला आणि कार्यालयाला मराठा आंदोलकांनी आग लावली होती. सोबतच त्यांनी बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय देखील जाळले होते.

सरकारने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही- जरांगे पाटील

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना कारवाईचा इशारा दिला आहे. राज्यात हिंसाचार खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंसाचार पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

One Comment on “हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *