हरिकृपानगर आठ दिवसांपासून तहानलेलाच!

बारामती, 22 जानेवारीः बारामतीमधील विकासाचे मॉडेल म्हणणाऱ्यांनो आईंना थंडीत शहरात पिण्याचे पाणी नाही. बारामतीतील उच्चभ्रू परिसरात बारा महिने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरातील हरिकृपानगर तहानलेलाच दिसत आहे.

महसूल खात्याच्या हलगर्जीपणामुळे बारामतीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास

यासह कसबा, मोरगाव रोड या परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी उपसा मोटर बिघडली आहे. त्यामुळे ती दुरुस्त करण्यास नगर परिषदेचा लालफितीच्या कामामुळे सदरचे काम गेले आठ दिवस पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.

दूध भेसळ रॅकेटचे बारामती कनेक्शन?

विकासाचे मॉडल म्हणून लोकांची गैरसोईकडे बारामती नगर परिषदेचे दुर्लक्ष करत असून लोकांना पिण्यास पाणी नाही. त्यामुळे लोकांच्या असंतोष निर्माण झाला आहे‌. या लालफितीच्या बोगस कारभारामुळे बारामतीकरांना वेठीस धरले जात आहे.

One Comment on “हरिकृपानगर आठ दिवसांपासून तहानलेलाच!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *