बारामती, 30 जानेवारीः(प्रतिनिधी-बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील ग्रामपंचायतमध्ये मकर संक्रांतीनिमित्त 28 जानेवारी 2023 रोजी संक्रांतीचे वाण घेणे निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम सर्वस्पर्शी फाउंडेशन संस्थेच्या वतीने घेण्यात आला. सदर कार्यक्रमात विधवा महिलांना प्राधान्या देण्यात आले.
बारामती एमआयडीसीमध्ये गांजाची तस्करी?
मकर सक्रांतीनिमित्त सर्वत्र वाण असलेल्या महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत असतो. मात्र ज्या महिलांचे पतीछत्र हरवले, त्यांच्यासाठी कोणी कार्यक्रम घेत नाही, ही बाब लक्षात घेत सर्वस्पर्शी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने बारामती विभागातील सर्वस्पर्शी फाउंडेशनच्या वतीने सुवासनी आणि विधवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
कोरोना काळातील थकित मालमत्ता कर बानपने माफ करावा- आरपीआय
प्रत्येक विधवा महिलेला सुवासिनीचे वाण देऊन तिला ही समाजात ताठ मानेने जगता यावे, यासाठी मुर्टी ग्रामपंचायत आणि सर्वस्पर्शी फाउंडेशन संस्था हा कार्यक्रम राबवत असल्याचे सारीका तांबे आणि निता सावंत यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासाठी सारीका तांबे, निता सावंत, निलम खोमणे, अश्विनी तांबे, अनुपमा मोरे व सीमा भोसले यांनी सुंदर असे नियोजन केले होते.
One Comment on “मुर्टीमध्ये सुवासनी आणि विधवा महिलांचा हळदी कुंकू”