बारामती, 17 जानेवारीः बारामती शहरातील टकार कॉलनी येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम 15 जानेवारी 2023 रोजी पार पडला. सदर कार्यक्रम श्रीमती विजयालक्ष्मी महिला बचत गटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
उंडवडी सुपे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवसाचे आयोजन
सदर कार्यक्रमाला नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा अनिता गायकवाड, नगरसेविका शितल गायकवाड, पत्रकार अनिल गायकवाड, राष्ट्रवादीचे बारामती शहर उपाध्यक्ष मिलिंद गायकवाड, महेंद्र गायकवाड, रितेश गायकवाड, महिला बचत गट अध्यक्ष अश्विनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामतीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे आयोजन
या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी उपस्थितीत महिलांशी संवाद साधला. हळदी- कुंकू या उपक्रमाचा उद्देशच महिलांनी एकत्र येवून विचारांची आदान प्रदान करणे, हा आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास मिलिंद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.