बारामतीत पोलीस छाप्यात लाखोंचा गुटखा माल जप्त

बारामती, 23 फेब्रुवारीः बारामती शहरातील कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे, अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली. सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला.

बेकायदेशीर भंगार व्यवसाय करणाऱ्यांवर बसणार चाप

सदर छाप्यात सिल्वर रंगाच्या इंडिका कार (एमएच 12 ईएन 9159) उभी असल्याचे दिसून आले. तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल, V1,आर.एम.डी, गुलाम व इतर गुटखा ब्रँडच्या गुटखा पुड्या मिळाल्या. त्यानंतर त्या ठिकाणी लगेच गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान चेक केले. त्या दुकानात सुद्धा गुटक्याचा माल मिळाला. त्याचबरोबर टॅंगो दारू 96 क्वार्टर मिळाला.
पोलिसांनी विमल, गुलाम, आर.एम.डी., V1तसेच सुगंधी तंबाखू किंमत 27 हजार 322 रुपये तसेच टॅंगोच्या 96 क्वार्टर किंमत 6 हजार 720 रुपये व गुटखा विक्रीतून आलेले रोख 9 लाख 260 रुपये, 1 लाख 24 हजार रुपये किमतीचा गुटखा, दारू, व 3 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली.

सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे संशयित आरोपी शंकर उर्फ अक्षय धोत्रे (रा. पतंग शहा नगर), नागे दावड (रा. पतंग शाह नगर) यांना अटक करण्यात आली. सदर ठिकाणावरून संशयित आरोपी आतिश धोत्रे हा फरारी झाला.

बेकायदेशीर भंगार व्यवसायिकांवर कारवाईसाठी प्रबुद्ध संघटनेचे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई अक्षय सिताफळ, दशरथ इंगोले, पोलीस हवालदार शिंदे यांनी केली आहे.

One Comment on “बारामतीत पोलीस छाप्यात लाखोंचा गुटखा माल जप्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *