बारामती, 3 नोव्हेंबरः बारामती येथील सब जेलमध्ये बंदिस्त असलेल्या न्यायालयीन कैद्यांना असलेले हक्काबाबत तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेविषयक मदती संदर्भात 2 नोव्हेंबर 2022 रोजी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर बारामती वकिल बार असोसिएशन तसेच जिल्हा व विधी सेवा यांच्यातर्फे घेण्यात आले. या शिबिरात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आतकरे आणि न्या. गिऱ्हे, सरकारी वकिल अॅड. सोनवणे किरण यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात ज्या कायद्यांना न्यायालयामध्ये त्यांची केस चालवण्याची ऐपत नाही किंवा वकिलाला देण्यासाठी पैसे नाहीत, त्या कायद्यांनी सदरची बाब न्यायाधिशांच्या लक्षात आणून देऊन त्यांना मोफत कायदेविषयक सल्लागार नेमणे बाबत विनंती केल्यास त्यांना जिल्हा विधिवसेवा यांच्यामार्फत मोफत सरकारी वकील दिला जाईल, असे सांगण्यात आले. तसेच त्यांना या सब्जेक्टमध्ये बंद केलेल्या आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांना त्याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही, असे कोणाचे प्रश्न आहेत का? त्याबाबतही न्यायालयाने विचारणा केली असता कुणीही कायद्यांनी तक्रार केली नाही.
बारामतीत 1988 नंतर पुन्हा कापसाचा लिलाव सुरु
तसेच या कोठडीत ठेवण्यामागे कोणत्याही कायद्याला, त्रास देण्याचा न्यायालयाचा उद्देश कधीच नसतो. फक्त त्याच्या वर्तणूकमध्ये सुधारणा व्हावी, हाच उद्देश असतो. त्यामुळे इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा, असेही न्यायाधिशांनी अपील केले. व्यावसायिकपणे गुन्हेगार करणाऱ्या लोकांपासून लांब राहावे, अशा बाबत सरकारी वकिल अॅड. किरण सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
इंदापुरात सीताफळ शेतीकडे वाढला कल
शिबिरास अॅड. शेरकर अजित, अॅड. राजकिरण शिंदे, अॅड. सोहेल शेख, अॅड. ऋषिकेश निलाखे हे बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच अॅड. प्रीतम क्षीरसागर, ग्रंथपाल वकील संघटना व बारामतीचे विधी व सेवा समितीचे अॅड. मिलिंद देऊळगावकर हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व जेलर मधुकर जाधव यांनी केले.
One Comment on “बारामतीत न्यायालयीन बंदींना कायदेविषयक अधिकाराबाबत मार्गदर्शन”