बारामती, 12 डिसेंबरः आई-वडील होणं, हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. मात्र पालक म्हणून जबाबदारी स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचे असते. मुलांना त्यांची स्वप्ने पाहुद्यात, त्यांना त्यांची पात्रता माहिती असते. तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्ने त्यांच्यावर लादू नका, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. रोहित पवार हे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आणि शारदाबाई पवार विद्या निकेतन यांच्या वतीने आयोजित पालक सभेत बोलत होते.
बारामतीत पीक विमा सप्ताह उपक्रमाचा शुभारंभ
रोहित पवार पुढे म्हणाले की, योग्य वयात योग्य निर्णय घेतला तर यशाच्या पायऱ्या चढता येतात, आयुष्याचे नियोजन करता येते. ऐनवेळी येणारी निराशा यामुळे टाळता येते. त्यासाठी मुलांचे मित्र बना. त्यांच्या भावना समजून घ्या. घरामध्ये सुसंवाद ठेवा, असेही ते म्हणाले.
कोऱ्हाळे बुद्रुक येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटली यांचा निषेध!
या प्रसंगी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनीही उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या मानव संसाधन अधिकारी गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, उपप्राचार्य यशवंत डुंबरे, शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे प्रमुख प्रा. योगेश झणझणे, प्रा. शरद ताटे यासह प्राध्यापक वृंद आणि पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य यशवंत डुंबरे यांनी केले.
2 Comments on “रोहित पवारांकडून पालकांना मार्गदर्शन”