बारामती, 15 जूनः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी ग्रामपंचायत येथे 14 जून 2023 रोजी उद्योग अनुदानावर मार्गदर्शनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उद्योगासाठी अनुदान कसे मिळवायचे? उद्योग मार्केट पर्यंत कसा पोहचवायचा? कोणता उद्योग केल्याने किती फायदा होईल? व दुग्धव्यवसाय करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात पी.टी .काळे यांनी मार्गदर्शन केले.
महावितरणचा हलगर्जीपणा आदित्यच्या जीवावर बेतला; 70 ते 75 टक्के भाजला
सदर कार्यक्रमाला मुर्टी, मोढवे, मोराळवाडी व जोगवडी आदी गावच्या नव व्यवसायिकांना तांत्रिक, आर्थिक अडचणींवर मार्गदर्शन करत त्यात येणाऱ्या समस्या यावर चर्चा करण्यात आली. तसेच अधिकारी व लोकप्रतिनिधी जर कार्यक्षम असतील तर कोणतेही प्रश्न सहज मार्गी लागतील, असे ही पी.टी . काळे यांनी म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येणार बारामतीत…
मोढवे गावचे शेतकरी भागुजी बनकर यांनी वनगाई यांच्या पासून होणाऱ्या शेतमालाच्या नुकसानाबाबत तक्रार केली. मी हे प्रकरण कृषी मंत्र्यांपर्यंत देतो, असे काळे यांनी येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिले. महिला बचत गट, शेतकरी बचत गट, आत्मा बचत गट व वैयक्तिक व्यवसायाला लागणारे भांडवल याच्यातून लाभ घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. पी. टी. काळे यांनी मुर्टी व चिरेखान येथील वस्तीवरील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यांची पहाणी करत त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे, मोराळवाडीच्या सरपंच पुनम कारंडे, जोगवडी गावचे सरपंच प्रभु महानवर यासह ग्रामसेवक आणि सदस्य ही उपस्थित होते.
One Comment on “मुर्टी गावात उद्योग अनुदानावर पी. टी. काळे यांचे मार्गदर्शन”