पुणे, 4 डिसेंबरः पुणे जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धेत बारामती तालुका बुद्धिबळ संघटना, बारामती (बीटीसीए) च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळाले आहे. पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारीच्या वतीने 2 डिसेंबर 2022 रोजी हवेली तालुक्यातील वाघोली येथील नेताजी सुभाषचंद्रबोस स्कुल, फुलगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील वयोगटातून विरेन विशाल डहाळे, उत्कर्षा ज्ञानेश्वर मंडले आणि समीक्षा ज्ञानेश्वर मंडले हे विद्यार्थी विजयी झाले आहेत.
बारामतीच्या सुपुत्राची राज्यकर निरीक्षक पदावर पदोन्नती!
सदर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची संघटनेच्या वतीने विभागीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना योगेश डहाळे सर आणि ज्ञानेश्वर मंडले सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच बारामती तालुका बुद्धिबळ संघटना बारामती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बारामती, सिद्धिविनायक फाऊंडेशन बारामती यांच्यातर्फे जिल्हास्तरावर अभिमानास्पद कामगिरी करणारे विरेन डहाळे, उत्कर्षा मंडले आणि समीक्षा मंडले या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
13 जागांसाठी तब्बल 61 इच्छुक रिंगणात!
One Comment on “जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रिडा स्पर्धेत बीटीसीए विद्यार्थ्यांचे घवघवीत यश”