बारामती, 4 मार्चः ‘जय भीम’ या दोन शब्दाची ताकद फार मोठी आहे, या दोनच शब्दांमुळे मी लोणावळा नगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून म्हणून निवडून येऊ शकलो, अशी आठवण रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी बारामतीत 1 मार्च 2023 रोजी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी बोलताना सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राच्या सचिवपदी अॅड. सुनील शिंदे, संघटकपदी विजय(डॅडी) सोनवणे तसेच वरिष्ठ उपाध्यक्षपदी रवींद्र कांबळे यांचा सत्काराचे आयोजन बारामती येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे बारामती तालुका व शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम शेलार होते.
मुर्टी गावात अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण संपन्न
आरपीआय कार्यकर्त्यांनी समाजात आपली पत वाढवली पाहिजे व देणारे हात झाले पाहिजे, जेणेकरून मार्केटमध्ये त्यांची किंमत वाढून लोक त्यांना जमेमध्ये घेऊ शकतील. केवळ कार्यकर्ते म्हणून मिरवण्यापेक्षा उद्योग धंद्याच्या माध्यमातून आपला व समाजाचा विकास घडवून आणावा. याकरता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्वोपरी मदत लोकनेते रामदास आठवले यांच्या माध्यमातून करू, असा विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी तत्पर व्हावे, असेही पुढे बोलताना प्रतिपादन केले.
भारतीय नायक दणका! बानप भंगार प्रकरण चौकशी समिती नियुक्त
याप्रसंगी रिपब्लिकन कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, उपाध्यक्ष मधुकर मोरे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा साबळे, जिल्हा युवती अध्यक्ष सुप्रिया वाघमारे, महिला तालुकाध्यक्ष सीमा चोपडे, प्रा. प्रभाकर घेरे सर, अॅड. अक्षय शितोळे, अॅड. अजित बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त करून सुनील शिंदे व विजय(डॅडी) सोनवणे यांनी पक्षासाठी आंबेडकरी चळवळीसाठी दिलेले योगदान बद्दल गौरवद्गार काढून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मधुकर मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस माऊली कांबळे व शहर युवकाध्यक्ष मयूर मोरे यांनी केले.
यावेळी शहर संपर्कप्रमुख निलेश जाधव, तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले, महिला आघाडी शहराध्यक्ष पूनम घाडगे, सीमा घोरपडे, शालन भोसले, हिराबाई लोणकर, मातंग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद खंडाळे, दादा सोनवणे, निहाल भोसले, राजू कांबळे, संग्राम भोसले, रामहरी बल्लाळ, राजेंद्र लांडगे, अनिल शिंदे, गणेश जाधव आदींसह मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधवांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
One Comment on “‘जय भीम’ या दोन शब्दात मोठी ताकद- सूर्यकांत वाघमारे”