पुणे, 05 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या (दि.06) रोजी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा गावागावांत रंगली आहे. तर निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शारदानगर माऊलीचा होलसेल केमिकल नशा?
दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज एकूण 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र यापैकी 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. तर पुणे जिल्ह्यातील भोर आणि खेड तालुक्यात सर्वाधिक 46 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहेत. यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यात 44 ग्रामपंचायतींसाठी, जुन्नर तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींसाठी, मुळशी तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी, बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींसाठी, वेल्हे तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी, मावळ तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी, पुरंदर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींसाठी, दौंड तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी, इंदापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींसाठी, हवेली तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
तसेच, बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात सुद्धा आज मतदान होणार आहे. काटेवाडी अजित पवार यांचे गाव आहे. त्यामुळे या गावातील निवडणुकीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. काटेवाडी गावातील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे. तर काटेवाडी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. याशिवाय भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची देखील या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतमध्ये आज मतदान होत आहे. या निवडणुकीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
यासोबतच, राज्यातील गावागावांमध्ये आज निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यामध्ये राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये आज निवडणूक होत आहे. तर याबरोबरच राज्यात 2 हजार 950 सदस्यपदांसाठी आणि 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत.
One Comment on “ग्रामपंचायत निवडणूक! अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला”