चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क

दिल्ली, 24 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये कोरोनानंतर नवीन आजाराने पुन्हा एकदा कहर केला आहे. चीनमधील मुलांमध्ये H9N2 (एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरस) चा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारावर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज एक निवेदन जारी केले आहे. केंद्र सरकार चीनमधील मुलांमध्ये H9N2 आणि श्वसन रोगांच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच यासंबंधीच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकार तयार आहे. याशिवाय, चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरण तसेच श्वसनाचे आजार या दोन्हींपासून भारताला कमी धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ह्या निवेदनात म्हटले आहे.

एस श्रीशांत विरोधात गुन्हा दाखल

दरम्यान चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि H9N2 यांचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांत श्वसनाच्या आजारांची प्रकरणे वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत H9N2 आजारावर उपाययोजना करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये H9N2 चे एक प्रकरण नोंदवले गेले होते, ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता.

बारावीत बायोलॉजी विषय नसला तरीही डॉक्टर बनता येणार!

यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने निवेदन जारी केले होते. मुलांमध्ये श्वसन रोग आणि H9N2 या आजाराच्या प्रादुर्भावावर माहिती देण्यासाठी त्यांनी चीनला विनंती केली आहे. या प्रकरणांचा श्वसन संक्रमणाच्या वाढीशी संबंध आहे की नाही हे स्पष्ट नाही, त्यामुळे शास्त्रज्ञांनी या परिस्थितीवर कठोर निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने या निवेदनात म्हटले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनला श्वसन आणि H9N2 या आजारांवर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चीनमधील लोकांनी या आजारावरील उपाययोजनांचे पालन करावे, आजारी लोकांपासून अंतर राखावे, आजारी असल्यास घरीच राहावे आणि मास्क वापरावे, यांसारख्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.

One Comment on “चीनमध्ये पसरणाऱ्या आजारासंबंधी भारत सरकार सतर्क”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *