सरकारी कर्मचारी तब्बल 162 दिवस गैरहजर

बारामती, 11 मेः बारामती प्रशासकीय भवनमधील एका सरकारी कर्मचाऱ्याचा माजुरीपणा समोर आला आहे. कर्मचाऱ्याच्या गैर जबाबदारपणामुळे नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने संबंधित कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुषार रमेश क्षिरसागर असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून प्रशासकीय भवनात ते शिपाई पदावर कार्यरत आहेत.

संबंधित कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता तुषार क्षिरसागर यांनी 8 नोव्हेंबर 2021 पासून विनाअनुमती कार्यालयामध्ये गैरहजर राहिले. कार्यालयाने त्या अनुषंगाने 16 डिसेंबर 2021 रोजी ज्ञापनाद्वारे गैरहजेरीबाबत योग्य त्या कारणमिमांसेसह जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन कार्यालयात रुजू होण्याबाबत कळविले. मात्र तुषार क्षिरसागर हे 19 एप्रिल 2022 रोजी कार्यालयात हजर झाले. हजर होताना रजेच्या अर्जात 8 नोव्हेंबर 2021 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान तब्येत बरी नसल्याने वैद्यकीय व कौटुंबिक कारणास्तव रजेवर असल्याचे सांगितले. मात्र त्या संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

दरम्यान, तुषार क्षिरसागर यांनी 8 नोव्हेंबर 2021 पासून विनाअनुमती गैरहजर असताना वैद्यकीय उपचार घेत असल्याचे व्हॉट्सअप ग्रुपवर पुण्याचे बी.ए.एम.एस. डॉ.पी.व्ही. चव्हाण यांचे 11 नोव्हेंबर 2021 रोजी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. त्यामध्ये तुषार क्षिरसागर यांना दुखत असल्याने डॉक्टरांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे नमूद केले.

मात्र रजा उपभोगून कार्यालयात रुजू होताना जिल्हा शल्यचिकित्सक सर्वोपचार रुग्णालयस पुणे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता केवळ रजेचा अर्जच सादर केला. त्यामुळे तुषार क्षिरसागर यांच्या 162 दिवसांच्या कालावधीची असाधारण रजा कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला मंजुरीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करणे शक्य होत नाही. त्यामुळे कार्यालयाकडून शिपाई तुषार रमेश क्षिरसागर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *