नवी दिल्ली, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) इंडियन फार्माकोपिया कमिशन (आयपीसी) ने एका औषधाच्या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. ‘मेफ्टाल स्पास’ (Meftal Spas) असे या गोळीचे नाव आहे. ही गोळी मासिक पाळीदरम्यान पोटदुखी कमी करण्यासाठी तसेच स्नायू, सांधेदुखी, हाडांचे रोग, वेदना होणे, दातदुखी, सूज आणि ताप यावर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या गोळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर ही गोळी घेताना काळजी घेण्याचा इशारा इंडियन फार्माकोपिया कमिशनने दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मेफ्टाल स्पास गोळीच्या दुष्परिणामांबाबत अलर्ट जारी केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1732811552842260754?s=19
मेफ्टाल स्पास या गोळीमध्ये मेफेनामिक ऍसिड हे असून, त्यामुळे धोकादायक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशारा इंडियन फार्माकोपिया कमिशनने दिला आहे. याशिवाय इंडियन फार्माकोपिया कमिशनने या अलर्टमध्ये म्हटले आहे की, “डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांनी मेफ्टल स्पास या औषधाच्या वापराशी संबंधित दुष्परिणामांकडे बारकाईने लक्ष द्यावे. तसेच कोणतेही दुष्परिणाम आढळल्यास लोकांनी त्याची माहिती नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर फॉर फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडियाला द्यावी. यासाठी तुम्ही www.ipc.gov.in या वेबसाईटवर किंवा ADR PvPI या अँड्रॉइड मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवू शकता.”
दरम्यान, अनेकदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही वेदनाशामक औषध घेतो. काही वेळेस आपल्याला माहीत हे देखील नसते की, सबंधित औषधाचे आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात. तर काही औषधांचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र त्यामुळे याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या पार्श्वभूमीवर, इंडियन फार्माकोपिया कमिशनने मेफ्टाल स्पास या गोळी संदर्भात अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या गोळीचे तुम्ही सेवन करीत असाल तर काळजी घेण्याची आवश्यकता आहे.