पुण्यात 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

पुणे, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील एका सराफाच्या शोरूम मधून तीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. यासोबतच चोरट्यांनी या शोरूमच्या लॉकरमधील 10 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड देखील चोरली आहे. ही घटना 31 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी, या शोरूमच्या मालकाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.



दरम्यान, पुण्यातील रविवार पेठ येथे एक सोन्याचे शोरूम आहे. या शोरूम मधील एकूण तीन कोटी किमतीचे पाच किलो इतके सोने चोरीला गेले आहे. सोबतच चोरट्यांनी लॉकरमधून 10 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड नेल्याचे ही या शोरूमच्या मालकाने तक्रारीत म्हटले आहे. तर ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एक चोरटा जर्किंग घालून लॉकरमधील सोने चोरताना दिसत आहे. तर हे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी पाहिले असून त्यादृष्टीने पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.



दरम्यान, या चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने या शोरूमचे लॉकर उघडले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे ही चोरी माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तर या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या चोरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *