बारामती, 28 नोव्हेंबरः बारामतीमधील माळेगाव कॉलनी येथील लक्ष्मी नगरमध्ये शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे काही दिवसापासून प्रेम संबंध निर्माण झाले होते. दोन्ही घरच्यांचा विरोध असल्याने प्रियकर व प्रेयसी लग्न करण्यासाठी घरातून निघून गेले. त्यानंतर प्रियसीची आई सुनिता चव्हाण (वय 46) व भाऊ मयूर चव्हाण (वय 22) हा वारंवार प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ विकास वाबळे (वय 27), आई व वडिल यांना दमदाटी करू लागले. परंतु मुलाच्या नातेवाईकांना त्यांचा मुलगा कुठे गेला, याबाबत काहीही माहिती नसल्याने ते हतबल होते. तसेच पोलीस ठाण्याला सुद्धा त्यांनी भीती पोटी तक्रार दिली नाही.
त्यानंतर दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 8 वाजता मयूर चव्हाण आणि त्याची आई सुनिता चव्हाण हे वाबळे यांच्या घरी गेली. तसेच तात्काळ मुलाला हजर करा, अशी दमदाटी करू लागले. दहशत निर्माण करण्यासाठी मयूर चव्हाण याने विकास वाबळे याच्या डोक्यात दगड मारला. यामुळे विकास जाग्यावरच बेशुद्ध पडले. त्यानंतर मयुर आणि त्याची आई यांनी विकासला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. विकासला बेशुद्ध अवस्थेत सुरुवातीला माळेगावच्या स्थानिक डॉक्टरकडे व नंतर भोईटे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.विकासची परिस्थिती अजूनही नाजूक आहे.
चाकूचा धाक दाखवत सरपंचाच्या घरीतील 10 लाखांवर डल्ला!
सदर घटनेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ तपासाची सूत्रे फिरवून संशयित आरोपी सुनिता चव्हाण आणि मयूर चव्हाण यांना अटक करून तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेतलेली आहे. सदरचा प्रकार घडल्यानंतर प्रेमी व प्रेमिका हे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी स्वतःहून सज्ञान असल्याने प्रेमी विवाह केल्याचे सांगितल्याने त्यांनाही संरक्षण देण्यात आले आहे.
BPL-4 चा भापकर 007 बनला नवा किंग!
सदर गुन्हा तपास बारामती शहर पोलीस ठाण्याने करण्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना आदेश दिले. यानंतर सुनील महाडिक यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील तसेच तपास पथकाचे सपोनि कुलदीप संकपाळ, कोळेकर, इंगवले, तुषार चव्हाण, शिंदे यांना आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्याने आरोपी तात्काळ अटक केली. अटकेनंतर न्यायालयाने संशयित आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. या बाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
बारामतीत आढळली दुर्मिळ जातीची बिबट्यासदृश्य प्राण्याची पिल्ले
One Comment on “प्रेयसीच्या भावाचा आणि आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला”