बारामती, 1 मेः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त 29 एप्रिल 2023 रोजी बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील मूकबधिर विद्यालयास जीवनावश्यक वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच बारामती शहरातील आमराई विभागातील प्रबुद्धनगर येथील अंगणवाडीस शालेय उपयोगी साहित्य भेट स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 97.37% मतदान
या दोन्ही कार्यक्रम आरपीआयचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आला. सदरील उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांना अभिवादन असल्याचे मत मान्यवर पाहुण्यांनी व्यक्त केले. तसेच यापुढील काळातही असे समाज उपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे मुख्य आयोजक रविंद्र सोनवणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे, बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, सीमा घोरपडे, मयूर मोरे, रविंद्र खरात, शेखर लोंढे, अविनाश कांबळे तसेच मूकबधिर विद्यालयातील शिक्षिका अश्विनी भोसले आणि अंगणवाडीतील सेविका इरफाना करचे, यासह इतर स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालक मंडळ निवडणुकीत दडपशाही!
2 Comments on “जयंतीनिमित्त मूकबधिर आणि अंगणवाडी शाळेला वस्तू भेट”