कोलकाता, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आयपीएल मधील लखनौ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गौतम गंभीरने आता अभिनेता शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीर आता आपल्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावताना दिसणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघात परतला आहे.
नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट
गौतम गंभीरने IPL 2022 आणि IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाच्या मार्गदर्शक पदाची भूमिका बजावली होती. त्याच्या कार्यकाळात लखनौचा संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला होता. दरम्यान गौतम गंभीरने 2011 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या कार्यकाळात कोलकाता संघाने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यांनी 5 वेळा प्लेऑफ गाठले होते. त्यानंतर 2017 मध्ये गौतम गंभीर कोलकाता संघाला सोडून गेला होता.
खोट्या जाहिराती बंद करा! रामदेव बाबांना कोर्टाने फटकारले
तत्पूर्वी आयपीएल 2023 स्पर्धा समाप्त झाल्यानंतर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक अभिनेता शाहरुख खानची भेट घेतली होती. त्यामुळे गंभीर कोलकाता संघात सहभागी होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे. लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक पद सोडल्यानंतर गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे.
❤️❤️ LSG Brigade! pic.twitter.com/xfG3YBu6l4
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 22, 2023
“मला लखनौचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघाशी संबंधित सर्वांचा पाठिंबा मिळाला. मी लखनौ संघाचे मालक डॉ. संजीव गोयंका यांचे आभार मानू इच्छितो. डॉ. गोएंका यांचे नेतृत्व उत्कृष्ट होते, मला आशा आहे की लखनऊ संघ भविष्यातही चांगली कामगिरी करेल, यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या चाहत्यांना अभिमान वाटेल. संघाला शुभेच्छा.” असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर कोलकाता संघात परतल्यानंतर गौतम गंभीरने आणखी एक ट्विट केले आहे. “मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, पण ही गोष्ट वेगळी आहे. मी परत आलो आहे जिथे हे सर्व सुरू झाले. मी केवळ केकेआरमध्येच परतत नाही तर सिटी ऑफ जॉयमध्ये परत येत आहे. मी परत आलो. मला भूक लागली आहे. मी 23 क्रमांकाचा खेळाडू आहे. मी केकेआर.” असे तो यामध्ये म्हणाला.
I’m back. I’m hungry. I’m No.23. Ami KKR ❤️❤️ @KKRiders pic.twitter.com/KDRneHmzN4
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 22, 2023
तर केकेआरमध्ये गंभीरचे स्वागत करताना शाहरूख खान म्हणाला की, “गौतम नेहमीच कुटुंबाचा एक भाग राहिला आहे आणि आता आमचा कर्णधार एक मार्गदर्शक म्हणून वेगळ्या अवतारात घरी परतत आहे. त्याची खूप आठवण येते आणि आता आपण सर्वजण उत्सुक आहोत. आम्हाला चंदू सर (चंद्रकांत पंडित) आणि गौतम यांना टीम केकेआरला पुढे नेताना आणि संघात खिलाडूवृत्ती निर्माण करताना बघायचे आहे.”
https://twitter.com/KKRiders/status/1727207097056817581?s=19
One Comment on “गौतम गंभीर पुन्हा शाहरूख खानच्या आयपीएल संघात!”