बारामती, 30 सप्टेंबरः बारामतीच्या तांदुळवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीत दारिद्र्य रेषेखालील मागासवर्गीय लोकांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, म्हणून बारामती नगर परिषदेच्या वतीने 29 सप्टेंबर 2022 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचा लाभ स्थानिक महिला, शिक्षित मुली यासह दारिद्र्य रेषेखालील घटकांनी घेतला.
पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रतिमा जनसामान्यात मलीन
सदर मेळावा घेण्यासाठी झोपडपट्टी सुरभा दलाच्या वतीने मागणी करण्यात आली होती. या मेळाव्यात झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर, राजू खलसे, लालासाहेब आडागळे, शंकरराव चव्हाण, सुरेश आडागळे, दत्तू कांबळे, यासह विविध मान्यवर हजर होते.