नवी दिल्ली, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यानूसार, 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे याचा परिणाम विशेषतः रेस्टॉरंट किंवा खाद्यपदार्थ व्यवसायावर होणार आहे. तसेच त्यामुळे हॉटेलमध्ये खाणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारने 16 नोव्हेंबर रोजी 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 50 रूपयांची कपात केली होती. त्यानंतर आज पुन्हा ही दरवाढ करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1,796.50 रुपयांना मिळणार आहे. तर यापूर्वी हे गॅस सिलिंडर 1,775.50 रुपयांना मिळत होते. तसेच मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,749 रुपयांना मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये हे गॅस सिलिंडर 1,968.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1,908 रुपयांना विकले जात आहे.
आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू
दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलोंच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर यापूर्वी केंद्र सरकारने या सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली होती. तेंव्हापासून 14.2 किलोचे हे गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपयांना मिळत आहे. तर हे गॅस सिलिंडर मुंबईत 902.50 रुपये, कोलकाता 929 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.
2 Comments on “गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागला”