बारामती, 24 ऑगस्टः (प्रतिनिधी/ उपसंपादक- अभिजीत कांबळे) बारामती शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील कचरा डेपोला आज, 24 ऑगस्ट 2023 (बुधवारी) रोजी रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आता पर्यंत सुमारे 40 गाड्यांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. मात्र अजूनही कचरा डेपोमध्ये आगीचा तांडव सुरुच आहे.
स्पीड पोस्ट कॉउंटरसाठी युवा क्रांती जनकल्याण संघटनेची मागणी
सदर आगीमुळे कचरा डेपोमधील करोडोंच्या मशीनी जळाल्याची माहिती बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सदर आगीमुळे रात्रीपासूनच विषारी धुरांचे लोट परिसरात पसरले आहे. सकाळच्या सुमारासही ढगात धुरांचे लोट दिसत होते. सदर घटनेचे काही व्हिडिओ ‘भारतीय नायक’च्या कॉमेऱ्यात टिपण्यात आले आहे. सदर आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, गेल्या काही वर्षभरापासून बानपच्या हद्दीमधील ओला, सुका कचरा हा 45 कचरा गाड्यांच्या माध्यमातून गोळा करण्यात येत आहे. दररोज सुमारे 50 ते 55 टन कचरा बानपच्या घंटा गाडीतून गोळा करण्यात येत आहे. सदर कचरा डेपोवर आणून त्याचे वेगवेगळ्या प्रकारात विल्लेवाट करण्यात येत होती. बारामती नगर परिषद आणि लुको कंपनीच्या करोडो रुपये किमतीच्या मशीनींच्या माध्यमातून या कचऱ्यांवरून प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच बायोमायनीकरीता काळे यांच्या मालकीची साईप्रो इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीच्या मशीनींचाही यात समावेश आहे. सदर करोडो किमतीच्या मशीनीचा विमा उतरविण्यात आला आहे. मात्र जाणून बुजून ही आग लावण्यात आली का? हा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.
नायलॉन मांजामुळे तीनजण मरता मरता वाचले!
One Comment on “बारामतीतील कचरा डेपो पेटला; करोडोंच्या मशीनी जळाल्या!”