इंदापूर, 22 ऑगस्टः इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावात 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. सदर बलात्कार प्रकरणात मुख्य संशयित आरोपी राहुल जाधव याला अटक केली असून इतर दोन संशयित आरोपी फरार झाले आहेत. भादविच्या विविध कलमान्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी, 20 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावधान! बारामतीत आरटीओच्या कारवाईला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील संशयित आरोपी राहुल जाधव (35 वर्ष) ने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मकाच्या शेतात नेत बलात्कार करत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने ओमनी गाडीमधून आलेल्या दोन साथीदारांनी चेहऱ्यावर रुमाल लावून पीडित मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी थोड्या वेळाने पीडितेला बेलवाडीच्या बसस्थानकावर ओमनीतून सोडले. बलात्कारानंतर मुख्य संशयित आरोपी राहूल जाधवने शनिवारी 4 च्या सुमारास पीडितेच्या घरी येत पीडितेच्या आईला जातीवाचक शिवीगाळ केली.
सदर प्रकार पीडितेच्या आईला समजल्यानंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राहूल जाधव याला अटक केली आहे. मात्र दोन संशयित आरोपी फरार झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.