बारामतीत मोटरसायकल चोरांची टोळी गजाआड

बारामती, 15 जानेवारीः बारामती शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध कंपनीच्या मोटरसायकली चोरीच्या घटना घडत आहेत. कित्येक दिवसांपासून बारामती शहरासह तालुक्यातून ठिकठिकाणाहून मोटर सायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. मात्र याला आता आळा बसला आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 13 जानेवारी 2023 रोजी मोटर सायकल चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 16 मोटर सायकलींसह चारजणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक दराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे हे बारामती एमआयडीसी, सुर्यनगरी परिसरात 13 जानेवारी 2023 रोजी पेट्रोलिंग करीत होते. या पेट्रोलिंग दरम्यान, आकाश नरूटे (वय 20 वर्ष, रा. लालपुरी कळंब, तालुका इंदापूर) हा सुर्यनगरी परिसरात संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो मोटरसायकल चोरी करीत असल्याची माहिती मिळाली.

बारामती जिंकण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत कलह

सदर संशयित आरोपी आकाश नरूटे याकडे आणखीन कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे साथीदार कौस्तुभ गावडे (वय 20, रा. कळंब, तालुका इंदापूर), प्रथमेश पवार (वय 20, रा. पंढरपूर, जि. सोलापूर), सोहन साठे (वय 20, रा. माढा, जि. सोलापूर), रोहित घोडके (वय 20, रा. कळंब, ता. इंदापूर) अशी नावे सांगितली. संशयित आरोपी आकाश नरूटे आणि त्याचे वरील संशयित साथीदार हे बारामतीसह पुणे, हांडेवाडी, सातारा, शिंगणापूर, दहिवडी, टेंभुर्णी, सोलापूर, देवाची उरुळी, लोणंद, मोहोळ आधी विविध गावातून आणि शहरातून मोटर सायकली चोरल्या होत्या.

यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने वरील संशयित आरोपींना वडाळा, सोलापूर येथून चौकशीकामी ताब्यात घेतले. चौकशीत वरील सर्व ठिकाण्यावरून गाड्या चोरल्याचे निदर्शनात आले. त्यावरून वरील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींकडून विविध कंपनींच्या तब्बल 16 मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सध्या सर्व संशयित आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर सर्व संशयित आरोपींवर चोरीच्या आरोपाखाली भादवि कलम 397 प्रमाणे खालील गुन्हे दाखल केले आहेत.

1 बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 604 / 22
2 बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर 408 / 22
3 बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा र.नंबर 706/22
4 बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा र.नंबर 619 / 22
5 बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा र. नंबर 370/22
6 सोलापूर तालुका पोस्टे गुन्हा रजिस्टर नंबर 950 / 22
7 सोलापूर ग्रामीण पो स्टे गुन्हा रजिस्टर नंबर 944/22
8 लोणंद पो. स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर 216 / 22
9 मोहोळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 10 37 / 22

जय मल्हार क्रांती संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी मदने यांची निवड

आतापर्यंत वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. या बाबतचा पुढील तपास सहाय्यक फौजदार कोलते आणि गुन्हे शोध पथक बारामती तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, बारामतीचे अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार कोलते. पो. हवा. राम कानगुडे, महिला पोलीस हवालदार आशा शिरतोडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी यांनी केली आहे.

पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दीपक दराडे हे करीत आहेत.

One Comment on “बारामतीत मोटरसायकल चोरांची टोळी गजाआड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *