बारामती, 16 नोव्हेंबरः बारामती शहरातील फलटण चौक येथील हॉटेल दुर्वाज येथे 11 नोव्हेंबर 2022 रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आदेश कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव आदींनी जात हॉटेल चालकासह कामगारांवर दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली. तसेच हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
बारामती उपविभागात 64 प्रकल्पांना मंजुरी
यातील फिर्यादीच्या डोक्यात तब्बल 13 टाके पडले आहेत. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी ऋषिकेश चंदनशिवे व तेजस बच्छाव यांना अटक केली होती. मात्र या घटनेनंतर संशयित आरोपी आदेश कुचेकर हा मुंबई येथे फरार झाला होता. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी आदेशला कुचेकरला 15 नोव्हेंबर 2022 रोजी तात्काळ अटक केली आहे. या सर्व संशयित आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक तसेच दंगल या अंतर्गत भादवीच्या कलमाप्रमाणे 307,384,427,143,147,149 यासह अर्म अॅक्ट 4 (25) या प्रमाणे गुन्हा दाखल केले आहेत.
दरम्यान, आदेश कुचेकर आणि त्याच्या साथीदारांनी काही महिन्यापूर्वी बारामतीतील नितीन वाईन्स या दुकानावर सुद्धा तोडफोड करून हल्ला केला होता. तसेच कसबा येथील एका युवकालाही मारहाण केली होती. ज्या दिवशी हा गुन्हा केला, त्याच दिवशी त्यांनी बारामतीमधील चैत्राली बारमध्ये सुद्धा धुडगूस घातलेला होता. परंतु भीतीपोटी अनेक व्यवसायाचे तक्रार देत नाहीत. संशयित आरोपींबाबत जर कोणाची तक्रारी असतील, तर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहनही बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.
आदेश कुचेकरसह त्याची गॅंग बारामती परिसरात वारंवार गुन्हे करत होते. या गँगमुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच संघटित गुन्हेगारी थोपवण्यासाठी करावी लागणारी कारवाई होणार आहे. त्याबाबत वरिष्ठांना पोलीस अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे. सदर संशयित आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सपोनी कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी केली आहे.
One Comment on “बारामतीत धुडगूस घालणाऱ्या गँगच्या म्होरक्या अटक!(व्हिडीओ)”