बारामती, 12 फेब्रुवारीः बारामती शहरातील परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे संविधान चषक 2024 चा 11 फेब्रुवारी रोजी टेनिस बॉलवरील अंतिम सामना (फानल मॅच) क्रिकेटचा सामना खेळवला गेला. सदर सामना हा गेमर्स क्रिकेट क्लब आणि क्षत्रिय क्रिकेट क्लब या दोन बलाढ्य संघात खेळला गेला. अति चुरशीच्या या सामन्यात मात्र गेमर्स क्रिकेट क्लबने शेवटच्या ओव्हरमध्ये दमदार विजय मिळवत संविधान चषकावर आपले नाव कोरले. चेतन काळंगेच्या अचूक आणि धडाकेबाज फटकेबाजीमुळे विजय खेचून आणला.
येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका जाहीर करणार; अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, 3 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या संविधान चषक स्पर्धेत बारामती तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील संघांनी बारामतीतील परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यानच्या काळात सदर स्टेडियम हे टेनिस बॉलच्या सामन्यांकरीता बंद करण्यात आले होते. यामुळे टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे स्थानिक खेळाडू हे नाराज झाले होते. मात्र आरपीआय (आठवले गट) चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे आणि बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांच्या पुढाकाराने स्थानिक खेळाडूंचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्थानिक खेळाडूंचा प्रश्न तातडीने मार्गी लावत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सदर मैदान हे खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले. बारामतीतील युवा खेळाडूंनी तसेच टेनिस बॉल क्रिकेटप्रेमींनी अजित दादांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; आमदारकी देखील सोडली
सदर संविधान चषक 2024 स्पर्धा ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खेळविण्यात आली. सदर स्पर्धा ही आरपीआय (आठवले गट) चे शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांच्या वतीने घेण्यात आली. सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक गेमर्स क्रिकेट क्लब, द्वितीय पारितोषिक क्षत्रिय क्रिकेट क्लब, तृतीय पारितोषिक टेंभुर्णी क्रिकेट क्लब आणि चतुर्थ पारितोषिक सागर भाऊ बंडगर क्रिकेट क्लब भिगवण संघाला मिळाले.
बक्षीस वितरणावेळी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे साधू बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते मोहन शिंदे, आरपीआय (आ) जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे, आरपीआय (आ) गटाचे बारामती तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, पत्रकार रणजीत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहिन बागवान, योगेश व्हटकर, इंद्रा साळवे, गणेश डेरे, शाबीब शेखआणि त्यांच्या टीमने भरपूर कष्ट घेतले.