मुंबईतील अटल सेतू या सागरी पुलावरून आजपासून सार्वजनिक वाहतूक सुरू

मुंबई, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ चे लोकार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. तत्पूर्वी, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या सागरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1746079235180044310?s=19

सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण: मुख्यमंत्री

मुंबईतील या सागरी पुलावरून आता सार्वजानिक वाहतूक सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे. “वाहनचालकांनी या सेतुवरून प्रवासाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे, वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या अटल सेतूची ओळख असून, या सेतूवरून प्रवास करताना आपल्या सगळ्यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

लोकांची जीवन सुलभता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल: पंतप्रधान

तत्पूर्वी, या सागरी पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात एक्स वर पोस्ट केले आहे. देशातील नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल, ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *