बारामती, 19 फेब्रुवारीः लहान उद्योग व्यवसाय, दररोजच्या उपजीविकेसाठी लोकांना छोट्या कर्जाची गरज लागते. कर्ज काढण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची व किचकट असल्यामुळे कर्ज काढून देतो, असे सांगणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गरज असलेली लोक, अपुरे कागदपत्र असलेले लोक त्यांच्याकडे जातात. असेच एका साताऱ्याचा निलेश फरांदे (वय 28, रा. आणेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा) याने त्याला बारामतीत कोणी ओळखत नाही, अशा ठिकाणी फसवून निघून जाण्याच्या दृष्टीने डीसी फायनान्स नावाने एक फॉर्म बारामती येथील गुणवडी चौकात सुरू केले.
सदर फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी एजंट नेमून लोन करून देतो, असा प्रचार केला. त्या एजंटच्या मार्फतीने आगाऊ पिग्मी लोकांकडून गोळा केली. त्या बदल्यात त्यांना सांगितले की, त्यांना एक लाखापर्यंत लोन मंजूर केले जाईल.
मोफत ब्युटी पार्लरचे परिपूर्ण क्लासेससाठी आरपीआयची मागणी
गरजूवंत लोकांनी त्यांना लोनची आवश्यकता असल्याने दहा ते पंधरा हजार रुपये हप्त्यामध्ये पिग्मी एक महिन्यापासून एजंटकडे दिले. एक दिवस हे डीसी फायनान्स या नावाने ओपन केलेले गुणवडी चौकातील कार्यालय बंद करून तो निघून गेला. त्याचे नेमलेले एजंटला सुद्धा तो कुठला आहे, हे माहीत नव्हते. त्याने लोकांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली.
आरटीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून आवाहन
पोलिसांनी तक्रारदारांकडून माहिती घेऊन सदरच्या व्यक्तीला जेजुरी या ठिकाणाहून अटक करून संशयित आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी घेतली आहे. सदर व्यक्तीकडून फसवलेल्या साडेचार लाखांपैकी 3 लाख रुपये रोकडमध्ये पोलिसांनी हस्तगत केले आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडके, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, सागर जामदार करत आहेत.
One Comment on “लोन मंजूरीच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक”