बारामतीत शेअर बाजाराच्या नावाखाली 56 लाखांचा गंडा

बारामती, 16 ऑगस्टः शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास 70 टक्के नफा मिळवून देतो, असे सांगून विश्वासात घेत बारामतीमधील तब्बल 18 जणांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गारमेंट व्यावसायिक संजय सातव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून संजय भुसकुटे (रा. जय टॉवर चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कऱ्हा नदी पात्रातील पाणी वाढणार; खबरदारीच्या सूचना

दिलेल्या फिर्यादीवरून, संजय सातव हे शेअर बाजारात छोटी मोठी गुंतवणूक करत असत. गुंतवणुकीमधूनच आरोपी संजय भुसकुटे यांच्या ऑफिसमध्ये संजय सातव यांच्या संशयित आरोपीसोबत ओळख निर्माण झाली. या भेटीदरम्यान, भुसकुटे यांनी ट्रेड एडीएशन या इन्व्हेस्टमेंट फर्मबद्दल सातव यांना माहिती दिली. ट्रेड इडिशन फर्ममध्ये शेअर बाजारासाठी गुंतवणूक केल्यास 80 टक्के नफा देण्याचे अमिष दाखवले. काही तोटा झाल्यास ट्रेड एडीशन फर्मचा संस्थापक या नात्याने सर्व जबाबदारी माझी राहिल, असे सांगत विश्वास संपादन केला. मोतीलाल ओसवाल हे या कंपनीमध्ये सब ब्रोकर आहेत, तुमचे पैसे सुरक्षित राहतील, असे ओसवाल यांनी सांगितले. त्यानुसार संजय सातव यांनी एकूण 5 लाखांची गुंतवणूक केली.

यासह विजय बनकर, सतिश किर्दक, कैलास कदम, उत्तम जगदाळे, जयवंत सातव, प्रशांत चव्हाण, अमोल खटावकर, राहूल खटावकर, रामदास कापसे, सचिन शितोडे, बाबुराव चव्हाण, संजय थोरात, अनिता कदम, स्नेहल सातव, सुजाता सुरासे, राजेश तांबडे, राजेश कवाडे या सर्वांनी प्रत्येकी 3 लाख रुपयांप्रमाणे 51 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूकीनंतर त्यांनी शेअर बाजार खात्याचे आयडी आणि पासवर्ड भुसकुटे यांना दिले. ठरल्याप्रमाणे 70 टक्के नफा न देता, त्यांनी गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *