माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन; देशभरातून शोक व्यक्त, नेत्यांकडून श्रद्धांजली

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे महान अर्थतज्ज्ञ आणि शांतीप्रिय व्यक्तिमत्व आपल्याला गमवावे लागले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी येताच देशभरातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ट्विट करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखाच्या काळात सामर्थ्य प्राप्त होईल अशी प्रार्थना त्यांनी यामध्ये केली आहे.

https://x.com/rashtrapatibhvn/status/1872335549497032850?t=-4PdEcXXvEkAsOvUXHZrLg&s=19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्वीट करून म्हटले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे त्या दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी प्रशासन आणि अकादमी दोन्ही क्षेत्रांमध्ये समान सहजतेने योगदान दिले. सार्वजनिक पदांवर कार्यरत असताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे देशसेवा, राजकीय जीवनातील निर्दोषता आणि सर्वोत्तम नम्रता यासाठी त्यांना नेहमीच आठवले जाईल. त्यांचे निधन हे सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी भारताच्या महानतम पुत्राला श्रद्धांजलि अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि प्रशंसकांच्या प्रति माझ्या सहानुभूती व्यक्त करते.”

https://x.com/PawarSpeaks/status/1872335004430401542?t=r2Vndfkg2PGNVa9Um_mZYg&s=19

शरद पवारांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की, “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो!”

https://x.com/RahulGandhi/status/1872334963229540738?t=tswFHIKXH3OHiUb8dmNpXQ&s=19

राहुल गांधींचे ट्विट

“डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत ज्ञान आणि प्रामाणिकतेने भारताचे नेतृत्व केले. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्रातील सखोल समज देशाला प्रेरणा देणारी होती. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. मी एक मार्गदर्शक आणि मेंटर गमावला आहे. लाखो लोक जे त्यांचा आदर करत होते, ते त्यांना गर्वाने आठवतील,” असे ट्विट काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

https://x.com/AmitShah/status/1872330890002473021?t=6qAfFBZTRVdlkbWSy8BzZQ&s=19

अमित शाह यांचे ट्विट

“माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर म्हणून आणि नंतर अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या शासन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1872332470403879171?t=keQ_SLc_INoxKRU7xD6Arw&s=19

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपल्याला एक महान विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. “भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान कधीही विसरणारे नाही. ते 10 वर्षे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते आणि त्यांचे योगदान अमुल्य आहे. त्यांना श्रद्धांजलि अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि समर्थकांच्या प्रति माझ्या संवेदना,” असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

https://x.com/mieknathshinde/status/1872340803541938588?t=PIgfxw1M2Sn7ivV6XHqsgg&s=19

एकनाथ शिंदेंचे ट्विट

“देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ. मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली” असे ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1872331544452591981?t=5jcB1j30hiiAzQtFuwo-Og&s=19

https://x.com/supriya_sule/status/1872327785718649111?t=CXdTsB0xxS87BbzN_ecd5A&s=19

अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे ट्विट

“माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मला मोठा शोक झाला आहे. ते एक सज्जन व्यक्ती होते, त्यांची दृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला कलाटणी देणारी ठरली. या कठीण वेळी माझे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयां आणि मित्रांसोबत आहेत.” असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत म्हटले की, “देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अतिशय कठिण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करुन दिला.देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आपली अद्वितीय बुद्धिमत्ता आणि नम्रतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *