पुणे, 29 मार्चः पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट यांचे आज, 29 मार्च 2023 रोजी दुपारी निधन झाले आहे. आज, सकाळी गिरीश बापट यांची तब्येत गंभीर झाल्याने तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी गिरीश बापट यांना अखेरचं सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले होते. पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट यांचं मोठं योगदान असून ते भाजपचे सर्वात जुणे जाणते नेते होते. त्यांच्या निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात आज, सायंकाळी 7 च्या सुमारास वैकुठं स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत.
बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांची आ. पडळकरांना साकडं!
गिरीश बापट यांच्या निधनाने राजकीय व्यक्तींकडून सोशल माध्यमांवर आदरांजली वाहण्यात येत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहली आहे. शरद पवारांनी ट्विटमध्ये ‘पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat‘ असं लिहीत श्रद्धांजली वाहली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat pic.twitter.com/qkATwWyx46
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
तसेच ‘पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ असंही ट्वीट केलं आहे. ‘भारतीय नायक’च्या टिमकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली.
आंबेडकर द्रोह म्हणजे राष्ट्रद्रोही!; चौधरीला हद्दपार करण्याची युवकांची मागणी
One Comment on “पुण्याच्या माजी पालकमंत्र्यांचे निधन; शरद पवारांनी वाहली श्रद्धांजली!”