उत्तराखंड, 25 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. उत्तराखंड येथील हल्द्वानीहून काशीपूरला जात असताना हरीश रावत यांची कार बाजपूर येथे दुभाजकाला धडकली. ही घटना काल (दि.24) रात्री घडली. या अपघातात हरीश रावत यांच्या व्यतिरिक्त दोघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये हरीश रावत त्यांच्या कमरेला आणि मानेला दुखापत झाली आहे. या अपघातात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या हाताला आणि दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांची ही दुखापत किरकोळ असल्याची माहिती मिळत आहे.
दाजीची मज्या अन् गावकरांना सजा!
हा अपघात झाल्यानंतर उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत हे काल त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हल्द्वानीला गेले होते. त्यानंतर ते आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत रात्री उशीरा काशीपूरला जाण्यासाठी निघाले. त्याचवेळी काशीपूरला जात असताना बाजपूर येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली.
डुब्लिकेट!
त्यानंतर हरीश रावत यांनी आज (दि.25) सोशल मीडियावर पोस्ट करीत या अपघाताची माहिती दिली. “हल्द्वानीहून काशीपूरला येत असताना माझी कार बाजपूर येथे दुभाजकाला धडकली. यात मला दुखापत झाली म्हणून मी हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांनी सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आणि मला डिस्चार्ज दिला. मी आणि माझे सहकारी आता पूर्णपणे ठीक आहे, काळजीचे कारण नाही”, असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, या अपघातात त्यांच्या फॉर्च्युनर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हा अपघात झाल्यानंतर त्यांच्या कारच्या एअरबॅगही उघडल्या नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
One Comment on “माजी मुख्यमंत्र्यांचा कार अपघात, थोडक्यात बचावले”