बारामती, 21 एप्रिल: लोकसभा निवडणुकीतील बारामती मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने प्रचार समितीची स्थापना केली आहे. या प्रचार समितीमध्ये त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. हे पदाधिकारी आता बारामती शहर आणि तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत. या प्रचार समितीमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या आहेत.
खालील पदाधिकाऱ्यांची प्रचार समितीत निवड
यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षापदी रत्नप्रभा साबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सचिवपदी सुनिल शिंदे, बारामती तालुका अध्यक्षपदी संजय वाघमारे, बारामती तालुका महिला अध्यक्षपदी सीमा चोपडे, बारामती शहर अध्यक्षपदी अभिजित कांबळे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी रविंद्र सोनवणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मधुकर मोरे, बारामती तालुका सरचिटणीस पदी माऊली कांबळे, बारामती तालुका महिला आघाडी कार्याध्यक्षा पदी पुनम घाडगे, कार्यकारणी सदस्य पदी सिमा घोरपडे, जिल्हा महिला सरचिटणीस पदी रजनी साळवे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी विजय सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.