लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोर गरीबांना अन्नदान

बारामती, 1 ऑगस्टः बारामती शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले जात आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात बेघर असणाऱ्या गोरगरीबांना अन्नदानाचा कार्यक्रम 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आला. सदर कार्यक्रम हा पै. सार्थक फौंडेशन महाराष्ट्र राज आणि आमराई तालीम ग्रुप यांच्या संकल्पनेतून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, सदर कार्यक्रमाची सुरुवात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन पै. सार्थक फौंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी पै. सार्थक फौंडेशनचे अध्यक्ष पै. गणेश आटपडकर, विक्रम (पंत) थोरात, कार्याध्यक्ष अमोल कुलट, मयुर कांबळे, अक्षय शेलार, धिरज सकट, यासह फौंडेशनचे पदाधिकारी आणि आमराई तालीम ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *