चिरेखानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती, 27 जानेवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती तालुक्यातील चिरेखानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी 2023 रोजी देशाची सेवा करणारे सध्या जम्मू काश्मिर या ठिकाणी सेवेत कार्यन्वित असलेले मुर्टी गावचे सुपुत्र राकेश राजपुरे (फौजी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

बारामतीमध्ये डिझेल चोर सक्रिय

दरम्यान, गावात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम प्रभात फेरी काढून शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी भाषणे ऐकवून दाखवली. अगदी अंगणवाडी पासून ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत श्रोत्यांची मने जिंकली. सदर कार्यक्रमासाठी चिरेखानवाडीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडच्या रंगीत तालीमला बडे अधिकारी गैरहजर?

शाळेचे मुख्याध्यापक विजय नलवडे सर व संजय जाधव सरानी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करत जिल्हा परिषद शाळा चिरेखानवाडी शाळे विषयी माहीती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राकेश राजपुरे (फौजी) यांनी सांगितली. तर विद्यार्थ्यांना आध्यात्मिक समजण्यासाठी ह.भ.प. गणेश महाराज बालगुडे यांनी उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन केले.

यासह विद्यालयासाठी सतत मदत करणारा शाळेचा माजी विद्यार्थी गणेश शेलार व ग्रामस्थ सहकार्य करत असल्याचे शाळेचे शिक्षक जाधव सरांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

2 Comments on “चिरेखानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *