महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण!

मुंबई, 01 मे : (विश्वजीत खाटमोडे) राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांनी आज विविध ठिकाणच्या कार्यक्रमांत सहभागी होऊन जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/AHindinews/status/1785507768226693545?s=19

https://twitter.com/mieknathshinde/status/1785500236536070622?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1785490481058918438?s=19

मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्म्या स्मारकाला भेट दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व 106 हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार यामिनी जाधव, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

याशिवाय महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल यांच्या हस्ते आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1785522798234091693?s=19

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1785538794235543631?s=19

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण!

महाराष्ट्र दिनानिमित्त आज पुण्यातील पोलीस संचलन मैदानात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी, पुणे पोलीस दलाच्या वतीने शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र दिनानिमित्त आज नागपूर येथील कस्तुरचंद पार्क याठिकाणी पोलीस संचलनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *