बारामती, 15 ऑगस्टः (प्रतिनिधी शरद भगत) संपुर्ण देशात आज, 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज, स्वातंत्र दिनानिमित्त बारामती तालुक्यातील मुर्टी गावात विविध ठिकाणी दहावीत पहिल्या दहा नंबर आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी येथे माजी सैनिक सुनील जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दुखःद! मराठा समाजाचा दिग्गज नेता हरपला
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयात एन.सी.सी. संचलन, बक्षिस वितरण, माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सदस्य विकास खोमणे यांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. यावेळी कार्यक्रमाला गावातील रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रामदास जगदाळे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील ग्रामस्थ यासह विद्यालयातील विद्यार्थी शिक्षिक व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भुसे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन पाचपुते सरांनी केले.