काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध! पहा सर्व नावे

मुंबई, 24 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी (दि.24) प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांनी कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने उमेदवारी दिली होती. याशिवाय काँग्रेस पक्षाच्या या यादीत पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, संग्राम थोपटे, विश्वजीत कदम, अमित देशमुख यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

https://x.com/INCMaharashtra/status/1849484044901449754?t=ZCYHaz6_Wyok_J_DsSQWig&s=19

85-85-85 जागा वाटपाचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हे प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढणार आहेत. तर उर्वरित जागांच्या संदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील या तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 65 उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवार आणि काँग्रेसने नुकतीच 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे राज्यातील लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.



काँग्रेसच्या उमेदवारांची यादी

1) अक्कलकुवा – के.सी. पडवी
2) शहादा – राजेंद्रकुमार गावित
3) नंदुरबार – किरण तडवी
4) नवापूर – श्रीकृष्णकुमार नाईक
5) साक्री – प्रवीण चौरे
6) धुळे ग्रामीण – कुणाल पाटील
7) रावेर – धनंजय चौधरी
8) मलकापूर – राजेश एकाडे
9) चिखली – राहुल बोंद्रे
10) रिसोड – अमित झनक
11) धामणगाव रेल्वे – विरेंद्र जगताप
12) अमरावती – सुनील देशमुख
13) तेओसा – यशोमती ठाकूर
14) अचलपूर – अनिरूद्ध देशमुख
15) देवळी – रणजित कांबळे
16) नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल गुडधे
17) नागपूर मध्यवर्ती – बंटी शेळके
18) नागपूर पश्चिम – विकास ठाकरे
19) नागपूर उत्तर – नितीन राऊत
20) साकोली – नाना पटोले
21) गोंदिया- गोपालदास अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23) ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार
24) चिमूर – सतीश वारजूकर
25) हदगाव – माधवराव पवार पाटील
26) भोकर – तिरूपती कदम कोंडेकर
27) नायगाव – मीनल पाटील (खतगावकर)
28) पाथरी – सुरेश वरपुडकर
29) फुलंब्री – विलास औताडे
30) मीरा भाईंदर – सय्यद हुसेन
31) मालाड पश्चिम – अस्लम शेख
32) चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33) धारावी – ज्योती गायकवाड
34) मुंबादेवी – अमीन पटेल
35) पुरंदर – संजय जगताप
36) भोर – संग्राम थोपटे
37) कसबा पेठ – रवींद्र धंगेकर
38) संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39) शिर्डी – प्रभावती घोगरे
40) लातूर ग्रामीण – धिरज विलासराव देशमुख
41) लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42) अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे
43) कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44) कोल्हापूर दक्षिण – रुतुराज पाटील
45) करवीर – राहुल पाटील
46) हातकणंगले – राजू आवळे
47 पलूस कडेगाव – विश्वजीत कदम
48 जाट – विक्रमसिंह सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *