बारामती, 4 डिसेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येतील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी 2851 प्रती टन दर जाहीर केला आहे. माळेगाव साखर कारखान्याने सोमेश्वर कारखान्यापेक्षा 51 रुपये जादा दर देऊन आघाडी घेतली आहे.
उद्यापासून माळेगावात विशेष मतदार नोंदणी मोहीम
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सोमेश्वर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप उसासाठी प्रती टन 2800 रुपये दर जाहीर करुन ऊस दराची कोंडी फोडली. सोमेश्वरने दर जाहीर केल्यानंतर माळेगाव किती दर काढतोय, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
13 जागांसाठी तब्बल 61 इच्छुक रिंगणात!
माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू हंगामात प्रतिटन 2851 रुपये दर जाहीर केला आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना अत्यंत चांगला दर देण्याची परंपरा माळेगावने जोपासली आहे. दरम्यान, चालू गळीत हंगामात माळेगावने आज, रोजी 9.66 च्या रिकव्हरीने 3 लाख 14 हजार 238 मेट्रिक टन गाळप केले आहे. तर 2 लाख 93 हजार 300 पोती साखर तयार केली आहे. सहविज प्रकल्पातून 1 कोटी 33 लाख 18 हजार 920 युनिट वीज तर 15 लाख 55 हजार लिटर इथेनॉल निर्मिती केल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
One Comment on “माळेगाव कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर!”