बारामती, 5 जानेवारीः बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज, 5 जानेवारी 2022 रोजी पहिले देहदान करण्यात आले. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर प्रथमच अमृतलाल गांधी यांचे देहदान पार पडले. त्यांच्या कुटुंबियांनी ही प्रक्रिया पार पाडली.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमृतलाल गांधी यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार लहान बंधू किरण गांधी यांनी अमृतलाल यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा देह आज, गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्त केला. किरण गांधी यांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
परिवहन अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गेला एकाचा बळी!
अमृतलाल गांधी (वय 72) यांचा मृतदेह त्यांच्या घरून शासकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शरीररचनाशास्त्रचे विभागप्रमुख डॉ. गीतांजली सुडके, उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, डॉ. वसीम हिरोली, किरण घुगे यांनी त्याचा स्वीकार केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 4 वर्षांत प्रथमच देहदान करण्यात आले. मृतदेहाचा उपयोग तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्यासाठी तसेच संशोधनासाठी होणार आहे. गांधी कुटुंबियांनी ही दुर्लभ कृती केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
बारामतीत राज्य ऑलम्पिक स्पर्धा क्रीडाला सुरुवात
One Comment on “बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिले देहदान”