मुंबईत 2 तास फटाके फोडता येणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई, 10 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत फटाके वाजवण्यासाठी आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानूसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. तर यापूर्वी सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच हायकोर्टाने मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती.

यावेळी कोर्टाने मुंबईत फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित केली. तसेच मुंबईतील बांधकामातील डेब्रिज वाहतुकीवर 19 नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय देखील हायकोर्टाने घेतला आहे. यासोबतच मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर बंदी घातली नसल्याचे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंवरील 13 वर्षांपूर्वीचा गुन्हा रद्द

त्याचबरोबर मुंबई महानगरातील प्रदूषणासंदर्भात 3 सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ही समिती वाढत्या प्रदूषणाच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊ शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. महापालिकांच्या दैनंदिन अहवालांच्या आधारे ही समिती आपल्या प्रतिक्रियांसह साप्ताहिक अहवाल तयार करून न्यायालयात सादर करणार आहे. मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा योजनेसाठी 1700 कोटींचा निधी

या प्रतिज्ञापत्रात मुंबई महानगरपालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तत्पूर्वी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भात कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीला पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत शहरातील प्रदुषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले होते.

One Comment on “मुंबईत 2 तास फटाके फोडता येणार; हायकोर्टाचा निर्णय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *