खंडाळा, 13 जूनः मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे वरील खंडाळा येथे एका ऑईल टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत आतापर्यंत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना ही आज, (मंगळवारी) 13 जून 2023 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता?
दरम्यान, खंडाळा घाटात आज, सकाळी एका ऑईल टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर टँकरने अचानक पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. सदर आग ही पुलाखाली देखील पसरली. त्यामुळे एक्सप्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली.
या अपघातामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे एकाच ठिकाणी तब्बल 5 तासांहून अधिक काळासाठी अनेक वाहने अडकून पडली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून प्रशासनाला निवेदन
सदर घटनेचे काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. या व्हिडिओमधून मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे वरील आगीचा तांडवचे रौद्र रूप समोर आले आहे. तर एका व्हिडिओमध्ये तर दोन तीन स्फोट झाल्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
One Comment on “मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर आगीचा तांडव; 4 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)”