रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

विझियानगरम, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आंध्र प्रदेशात दोन रेल्वेंची धडक झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर झाला आहे. ही घटना काल (दि.29) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी विशाखापट्टणम-रायगडा या पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर एक्स्प्रेसला मागून धडक दिली. त्यावेळी ही रेल्वे सिग्नलअभावी रेल्वेमार्गावर थांबली होती. त्याचवेळी हा अपघात झाला. या रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर 54 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे फडणवीसांना निवेदन

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमहून पलासाला जाणारी स्पेशल पॅसेंजर ट्रेन कोठासावत्सला जवळ अलमांडा आणि कंटकपल्ले दरम्यानच्या रुळांवर सिग्नलअभावी थांबली होती. त्यावेळी विशाखापट्टणम-रायगडा या पॅसेंजर स्पेशल ट्रेनने या थांबलेल्या रेल्वेला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामुळे या रेल्वेंचे डबे घसरले आणि ते दुसऱ्या रेल्वेमार्गावर जाऊन पडले. या अपघातानंतर प्रशासन आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. रात्रीच्या अंधारात हे बचावकार्य सुरू होते. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामधील 4 रुग्णांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर हा रेल्वेअपघात मानवी चुकांमुळे झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या रेल्वेच्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून अलमांडा आणि कंटकपल्ले सेक्शन दरम्यान झालेल्या या रेल्वे अपघाताचा आढावा घेतला. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना या अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यावेळी मोदी यांनी शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमी लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. सोबतच पंतप्रधान मोदींनी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2.50 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या – जरांगे पाटील

One Comment on “रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *