अखेर ट्विन टॉवर झाला जमीनदोस्त

नोएडा, 28 ऑगस्टः उत्तर प्रदेश राज्यातील नोएडा येथील बेकादेशीर ट्विन टॉवर आज, 28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. ट्विन टॉवर्स देशातील सर्वात उंच इमारत असून गेल्या काही वर्षांपासून चर्चा होती. नियमांची पायमल्ली करून सदर 32 मजली अ‍ॅपेक्स तर 29 मजली सियान टॉवर्स उभारण्यात आले होते.

दरम्यान, 31 ऑगस्ट 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र तीन महिन्यांचा अवधी देऊनही टॉवर्स पाडले नव्हते. त्यानंतर 22 मे 2022 पर्यंत टॉवर्स पाडण्याची वाढीव वेळ दिला होता. मात्र टॉवर्स पाडण्यास पुन्हा 3 महिने वाढीव मुदत दिली. अखेरची एनओसी मिळवत आज, 28 ऑगस्ट रोजी ट्विन टॉवर्स जमिनदोस्त करण्यात आली आहे.

ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम एडिफाय इंजिनिअरिंगला देण्यात आले. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी तब्बल 46 जणांची टीमने काम केले. तर दररोज 12 तास स्फोटकं लावण्याचे काम करण्यात आलं. अवघ्या 3 मिनिटांत अ‍ॅपेक्स आणि सायन नावाचे हे ट्विन टॉवर्स पाडण्यात आले. टॉवर्स पडल्यानंतर आसपासच्या परिसरात धुळीचे वातावरण तयार झाले होते. धुळीचे कण जास्त पसरू नये, म्हणून अग्निशमन दलाकडून इतर इमारतीवरून पाणी मारण्यात आले.

बेकायदेशीर बहुमजली इमारत पाडणे, ही देशातील पहिली वेळ आहे. ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर मुंबई, पुणेसह देशभरातील मोठ मोठ्या शहरातील बेकायदेशीर इमारतींना यामुळे धडकी भरली आहे. आता या घटनेनंतर बेकायदेशीर इमारती जमिनदोस्त होतील का?  हा यानिमित्त प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे- वैराट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *