अखिर भारतीय मराठा महासंघाच्या बॅनरवरून शरद पवार गायब?

बारामती, 23 डिसेंबरः बारामती येथील सहयोग सोसायटी समोरील जिजाऊ भवन येथे 25 डिसेंबर 2022 रोजी 10 वाजता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे बॅनर बारामती शहरात चौका चौक बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे. मात्र सदर फोटोवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, बारामतीच्या खासदरा सुप्रिया सुळे यांचा फोटो नसल्याने अनेकांच्या बहुया उंचावल्या आहेत. यामुळे आयता मुद्दा विरोधकांना मिळाला आहे.

बारामतीत वीज कर्मचारी, अभियंता संघटनेची निषेधार्थ रॅली

बारामतीत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मेळाव्याचे आयोजन हे अखिर भारतीय मराठा महासंघ, बारामती तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा समाजातील तरुण, तरुणी व्यावसायिकांना व्यावसायासाठी कर्ज योजनांची माहिती, सारथी आणि व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळावा घेण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. मात्र शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही फोटो गायब झाल्याची टिका भाजप पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड यांनी केली आहे. या संदर्भात अक्षय गायकवाड यांनी ट्वीट आणि फेसबुकवरून बोचरी टिका केली आहे.

सध्या या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच या बॅनरवरून विरोधकांना आयताच मुद्दा सापडला आहे.

 

 

One Comment on “अखिर भारतीय मराठा महासंघाच्या बॅनरवरून शरद पवार गायब?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *