या जाहीर सूचनेनुसार, शहरात पॉलिस्टीरीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरीनसह प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, केंडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल), प्लेटस, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉन पेक्षा कमी) यासह सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स)- हॅडल असलेल्या व नसलेल्या, कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन- ओव्हन बॅग्स (पॉलीप्रोपिलीनपासून बनविलेले) एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन जसे डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरीता) आदी एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच या जाहीर सूचनेद्वारे सर्व उत्पादक, साठवणूकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यवसायिक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र/ सिनेमा केंद्र/ पर्यटन ठिकाण/ शाळा/ महाविद्यालय / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खाजगी संस्था) यासह नागरीकांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
तसेच प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपयांचा दंड असेल, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये तर तिसऱ्या गुन्ह्यासाठी 25 हजार आणि 3 महिन्याचा कारावास असे दंडाचे स्वरुप आहे.