अखेर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये वापसी!

मुंबई, 27 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्स संघात परत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत. त्यानुसार, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघाला रामराम ठोकत मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. मात्र त्याचवेळी मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला सोडले आहे. त्यामुळे कॅमेरून ग्रीन आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळणार आहे. तर याची अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1729044340419555826?s=19

हा सर्व व्यवहार पैशांच्या स्वरूपात झाला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये दिले आहे. त्याचवेळी मुंबईने कॅमेरून ग्रीनला विकल्यामुळे त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 17.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्याला काही करून मुंबई इंडियन्स आपल्या संघात घेणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, काल सायंकाळी गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला रिटेन केल्याची बातमी समोर आली होती. तर काही तासानंतर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला विकत घेतले असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. तर आज या बातमीला आयपीएल प्रशासनाने अधिकृतपणे दुजोरा दिला आहे.

अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

दरम्यान, हार्दिक संघातून गेल्यानंतर गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा फोटो शेयर करीत त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी म्हणाले, “गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याने फ्रँचायझीला दोन अप्रतिम सीझन देण्यात मदत केली. ज्यामुळे एक आयपीएल चॅम्पियनशिप जिंकली आणि एका फायनलमध्ये हजेरी लावली. त्याने आता आपल्या मूळ संघ मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भावी प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा देतो.”

तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचे आपल्या संघात स्वागत करीत एक पोस्ट शेयर केली आहे. “यामुळे अनेक अद्भुत आठवणी परत येतात. मुंबई…. वानखेडे…. पलटण…. परत आल्याने बरे वाटते.” असे ते यात म्हणाले आहेत. याविषयी मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हार्दिकचे मायदेशी स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे! आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हा एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे! मुंबई इंडियन्सची तरुण प्रतिभावंत होण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिकने खूप पुढे मजल मारली आहे आणि त्याच्यासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्यात काय आहे याबद्दल आम्ही उत्सुक आहोत!” अशा नीता अंबानी म्हणाल्या.

पवारांवरील आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर; नितेश राणेंचा तो फोटो शेयर

One Comment on “अखेर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्समध्ये वापसी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *