कारखान्याच्या गोदामाला भीषण आग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

काळेवाडी, 03 जून: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातील एका कारखान्याच्या गोदामाला सोमवारी अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील काही गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे ही आग वाढतच गेली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या गोदामाला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

https://twitter.com/ANI/status/1797538717672104019?s=19

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1797554679603466271?s=19

कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. परंतू, या आगीच्या घटनेमुळे सदर कंपनीच्या गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग जास्त पसरली. त्यामुळे काळ्या धुराचे लोट हवेत उडताना दिसत होते. या आगीचे रौद्र रुप पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यावेळी अग्निशमन दलाने याठिकाणी कुलिंग ऑपरेशन करून ही आग आटोक्यात आणली.



तर आग नेमकी कशामुळे लागली? आणि या दुर्घटनेत किती नुकसान झाले? हे अद्याप कळू शकले नाही. या माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या आगीत संबंधित कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीच्या घटनेचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *