सातवांना गोडघास मात्र झोपडपट्टी वासियांना फास

बारामती, 27 जानेवारीः बारामती शहरात महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा. लि. कार शोरूमच्या मालकाने 30 फुटी रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र बारामती नगर परिषदेने या बेकायदेशीर बांधकामाचे मोजमाप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. साधारणपणे 20 हजार स्क्वेअर फुटचे बेकायदेशीर जागेवर बांधकाम केल्याचे बानप कर विभागाचे कर्मचारी सांगत आहे.

चिरेखानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

कृषी निवासी व वाणिज्य बांधकामास परवानगी असतानाही महसूल विभागचे सगळे नियम धाब्यावर बसून संपूर्ण बांधकाम हे वाणिज्य बांधकाम केले आहे. हजारो लोकांची गैरसोय होत असताना सार्वजनिक रस्ता खुला केला जात नाही. तर बारामतीच्या आमराईमधील चंद्रमणीनगर, भीमनगर, सुहासनगर, विठ्ठलनगर ते सिद्धार्थनगरच्या अंतर्गत रोडसाठी, फुटपाथसाठी गोरगरिबांना छळले जात आहे.

बारामतीमध्ये डिझेल चोर सक्रिय

यावरून लाखो रुपयांचा कर बुडवणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहेत, तर दुसरीकडे पोटासाठी काबाड कष्ट करणाऱ्या गोरगरिबांना बारामती नगर परिषदेकडून छळले जात आहे. बानपचे कर विभाग प्रमुख महेश आगवणे यांच्या आशिर्वादाने सातवांचा लाखो रुपयांचा कर बारामती नगर परिषदेला मुकावा लागत असून क्षेत्रीय अधिकारी व कर विभाग प्रमुख महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रा.लि. कार शोरूमला आर्थिक फायदा होण्याच्या हेतूने कर्तव्यात कसूर करीत आहेत.

One Comment on “सातवांना गोडघास मात्र झोपडपट्टी वासियांना फास”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *